थंडरबॉल

थंडरबॉल ही भारतभर खेळली जाणारी स्टँड-अलोन लॉटरी आहे जी प्रत्येक सोडतीत आकर्षक रोख बक्षिसांची संपत्ती देऊ करते. जॅकपॉट्सचे मूल्य किमान 1 कोटी रुपये असते आणि जॅकपॉट विजेते कोणी नसल्यास ते पुढील सोडतीत नेले जाईल.

तुम्ही अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून विकत घेतलेली थंडरबॉलची तिकिटे तुमच्याकडे असतील व तुम्ही ती अद्याप तपासली नसल्यास, तुमच्यावर रोख रकमेचा वर्षाव होऊ शकतो. थंडरबॉलची बक्षिसे एक मुख्य आकडा व थंडरबॉल जुळल्यास 20 रुपयांपासून सर्व पाच मुख्य बॉल्स व थंडरबॉल जुळल्यास 1 कोटी रुपयांपर्यंत आहेत. हे आहेत सर्वात अलिकडील थंडरबॉल सोडतींचे निकाल.

ताजे थंडरबॉल सोडतीचे निकाल
पुढील जॅकपॉट्स
  • ₹ 1,00,00,000
  • मंगळवार 16th जुलै

मागील थंडरबॉल सोडतीचे निकाल

मंगळवार 2 जुलै 2019
7 19 25 37 41 3
मंगळवार 25 जून 2019
11 18 20 21 25 13
मंगळवार 18 जून 2019
9 10 23 30 35 14
मंगळवार 11 जून 2019
9 10 26 27 41 13

थंडरबॉल कसे खेळायचे

थंडरबॉल खेळण्यासाठी तुम्ही एकतर शक्य असलेल्या 42 मधून पाच आकडे अधिक 1 ते 15 च्या दुसऱ्या मॅट्रिक्समधून थंडरबॉल म्हणून ओळखला जाणारा एक अतिरिक्त आकडा निवडू शकता किंवा लकी पिक सुविधा वापरून तुमचे आकडे यादृच्छिकपणे निवडले जाऊ द्या. जॅकपॉट जिंकण्यासाठी तुमचे काढलेले सर्व सहा आकडे जुळले पाहिजेत, पण जॅकपॉटबरोबरच प्रत्येक सोडतीत अतिरिक्त सात बक्षीस स्तर असतात जेथे फक्त एक मुख्य आकडा व थंडरबॉल जुळवून तुम्ही बक्षिस जिंकू शकता.

पुढील टेबल विजेते आकडे संयोगासहित सर्व थंडरबॉल बक्षिसे आणि जिंकण्याच्या शक्यता दर्शवते.

जुळणी शक्यता बक्षिस (रु)
5 + थंडरबॉल 12,760,020 मध्ये 1 1 कोटी
5 911,430 मध्ये 1 40,000
4 + थंडरबॉल 68,973 मध्ये 1 25,000
4 4,927 मध्ये 1 2,500
3 + थंडरबॉल 1,916 मध्ये 1 1000
3 137 मध्ये 1 50
2 + थंडरबॉल 164 मध्ये 1 50
1 + थंडरबॉल 39 मध्ये 1 20
थंडरबॉल बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता: 25 मध्ये 1

थंडरबॉल सोडती दर आठवड्यात मंगळवारी रात्री 10.00 आणि 10.30 भाप्रवे दरम्यान काढल्या जातात आणि टेलिव्हिजन चॅनल झी झिंगवर थेट प्रक्षेपित केल्या जातात.

मला थंडरबॉलची तिकिटे कोठे विकत मिळू शकतात

ऑनलाईन

तुम्ही अधिकृत प्लेविन लोट्टो वेबसाईटवरून थंडरबॉल तिकिटे ऑनलाईन खरेदी करू शकता. तिकिटे ऑनलाईन खरेदी करणे सोपे आहे आणि तुम्ही फक्त तुमचे आकडे निवडायचे असतात, किंवा आकडे तुमच्यासाठी यादृच्छिकपणे निवडले जाण्यासाठी तुम्ही लकी पिक चौकोनावर खूण करू शकता, आणि नंतर तुम्ही किती आठवडे खेळू इच्छिता ती संख्या निवडा (जास्तीत जास्त सहा आठवडे आधीपर्यंत).

ऑनलाईन खरेद्या केल्या जाण्यापूर्वी तुम्हाला प्लेविन कार्डाची गरज भासेल, जी सर्व किरकोळ लॉटरी विक्रेत्यांकडे किंवा एसएमएस वा ईमेलद्वारा खरेदीसाठी उपलब्ध असतात. रु. 200, 500, 1,000 व 5,000 अशा पूर्व-निर्धारित मूल्यांरह ही कार्डे येतात आणि ऑनलाईन तिकिट खरेदीसाठी या तुमच्या पेमेंट पद्धती आहेत.

तिकिटे ऑनलाईन खरेदी करणे सुलभ आहे आणि याचे अनेक फायदे आहेत ज्यांमध्ये तुमचे तिकीट सुरक्षितपणे ऑनलाईन साठवणे, तिकिटे खरेदी करण्यासाठी रांगेत उभे रहावे न लागणे, तिकिटे सोडतीपूर्वी आगाऊ खरेदी करण्याची क्षमता आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे जिंकलेली कोणतीही रक्कम तुमच्या प्लेविन कार्डावर थेट जमा होऊन, प्राप्त करण्यासाठी वा भविष्यात तिकीट खरेदीसाठी तुम्हाला उपलब्ध होणे ही वस्तुस्थिती यांचा समावेश आहे.

किरकोळ विक्रेता

तुम्ही थंडरबॉल तिकिट(टे) अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून वैयक्तिकपणे खरेदी करू शकता. फक्त प्लेस्लिपवर तुम्ही किती सोडती खेळू इच्छिता त्या संख्येसह तुमचे आकडे भरा आणि ते तिकिट रोखपालाकडे सुपुर्द करा, जो प्लेस्लिपवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला एक तिकिट देईल जे तुमचा खरेदीचा पुरावा आहे. तुम्ही किरकोळ विक्रेत्याकडून तिकिटे खरेदी करायचा निर्णय घेतल्यास, कृपया तुमचे तिकीट सुरक्षित ठेवा कारण तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसांवर दावा करण्यासाठी तुम्हाला त्याची गरज भासेल.

थंडरबॉल बक्षिसे 90 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतात म्हणून प्रत्येक सोडतीनंतर तुम्ही तुमचे(ची) तिकिट(टे) शक्य तितक्या लवकर तपासा आणि तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसांवर ताबडतोब दावा करा असा सल्ला जोर देऊन आम्ही देउ इच्छितो.