केनो लॉटरी

केनो लॉटरी हा पॅन इंडिया नेटवर्क लिमिटेडद्वारा चालवला जाणारा इंडियन लॉटरी खेळ आहे. खेळाडू रु. 21 लाखांपर्यंत जिंकू शकतात व जॅकपॉट प्रत्येक सोडतीसाठी सारखाच असतो. आपण आपल्या आकड्यांवर एकाहून अधिक पैज लावू शकत असला व त्यानुसार बक्षिसे वाढत असली, तरी तिकिटाचे मूल्य रु. 13 असते. सोडती रोज दोनदा भारतीय प्रमाण वेळ 18.00 व 21.00 वाजता होतात.


केनो कसे खेळायचे

दोन ते दहामधील किती आकडे आपल्याला भाकीत करायला आवडेल ते निवडा. यांना स्पॉट्स म्हटले जाते. आपण तीन आकडे भाकीत करायचे निवडले, तर याला स्पॉट 3 खेळ म्हणतात, आपण चार अंदाज करायचे ठरवले, तर तो स्पॉट 4 होतो, व याप्रमाणे. आपण जितके अधिक आकडे खेळता, तितकी संभाव्य बक्षिसे मोठी होतात.

नंतर आपण आपल्या आकड्यांवर लावायच्या पैजांची संख्या निवडता. प्रत्येक पॅनेलसाठी कमाल पैजांची संख्या दहा आहे, ज्यानुसार आपल्या बक्षिसात गुणाकार होतो.

आपण हे केल्यानंतर 20 च्या पूलमधून आपल्या पेस्लिपवर खुणा करून आपले आकडे निवडा. आपल्याला आपले स्वतःचे आकडे निवडायची इच्छा नसल्यास, क्विक पिक व लकी पिक पर्याय आपल्यासाठी आपोआप स्वैर ओळ निर्माण करतात.

जॅकपॉट बक्षिस जिंकण्यासाठी स्पॉट 10 खेळाडूंचे त्यांनी लावलेले सर्व दहा आकडे काढलेल्या 20 आकड्यांशी जुळणे आवश्यक आहे. केनो लॉटरीच्या विविध खेळांपैकी सर्वांमध्ये एका पैजेसाठी बक्षीस रचना खालीलप्रमाणे आहे:

जुळलेले आकडे
भाकीत केलेले आकडे 2 3 4 5 6 7 8 9 10
स्पॉट 2 140
स्पॉट 3 40 200
स्पॉट 4 20 50 600
स्पॉट 5 30 250 4,500
स्पॉट 6 20 90 800 5,000
स्पॉट 7 20 30 150 1,300 40,000
स्पॉट 8 20 100 1,000 4,965 3.5 Lacs
स्पॉट 9 20 50 250 1,100 55,000 7.5 Lacs
स्पॉट 10 10 30 120 1,000 10,000 80,000 21 Lacs

केनो लॉटरीची बक्षिसे कशी क्लेम करावी

केनो लॉटरीची रु. 10,000 पर्यंतची बक्षिसे अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून क्लेम करता येतात. रु. 10,000 च्या वरची बक्षिसे क्लेम फॉर्म वापरून क्लेम करता येतात. अधिक माहितीसाठी आपण आपल्या स्थानिक किरकोळ विक्रेत्याशी संपर्क साधू शकता.

केनो लॉटरी तिकिटे

ऑनलाईन

प्लेविन कार्ड वापरून अधिकृत प्लेविन वेबसाईटवरून केनो लॉटरी तिकिटे खरेदीसाठी उपलब्ध आहेत. प्लेविन कार्डे अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडे खरेदीसाठी उपलब्ध आहेत वा एसएमएस वा ईमेलद्वारा आपण कार्ड ऑर्डर करू शकता. कार्डे आधीच-भरलेल्या रु. 200, 500, 1000 व 5000 या रकमांमध्ये येतात. खेळाडूंनी याची नोंद घ्यावी की ते फक्त प्लेविन कार्ड वापरून ऑनलाईन खेळू शकताता व अन्य पेमेंट पद्धती स्वीकारल्या जात नाहीत.

किरकोळ विक्रेता

केनो लॉटरी तिकिटे कोणत्याही अधिकृत किरकोळ केंद्रातून खरेदी करता येतात. आपण आपली प्लेस्लिप भरल्यावर, ती किरकोळ विक्रेत्याकडे सुपुर्द करा, जो तिकिटावर प्रक्रिया करण्याची कार्यवाही करेल. तिकिटे सुरक्षित व जपू्न ठेवण्याची आठवण खेळाडूंना केली जात आहे, म्हणजे जिंकलेल्या बक्षिसांवर दावा करण्यासाठी खरेदीचा पुरावा म्हणून ती वापरता येतील.